सजावट प्लेरूमची
आजकाल टोलेजंग इमारतींच्या
आसपास एखादे मोकळे ग्राउंड सापडणे तसे मुश्किलच झाले आहे. मग लहान मुलांनी
खेळायचे कुठे हा प्रश्ान् निर्माण होणे सहाजिकच आहे. मुलांना बाहेर जाऊन
मैदानी खेळ खेळायला मिळत नसल्यास दिवसभर घरात बसून ते एकतर घरात बसून
टीव्ही बघणार किंवा व्हिडीओ गेम खेळणार. आणि आपणही त्यांना थांबवू नाही
शकणार. त्याऐवजी मुलांना घरातच एखादी मोकळी प्लेरूम तयार करून दिली तर?
आपले घर चांगले प्रशस्त असल्यास आपल्याला आपल्या लहान मुलांसाठी घरातल्या
घरात छोटे, बैठी खेळ खेळण्याकरीता एखाद्या प्लेरुमची रचना
गृहसजावटकारांकडून करून घेेऊ शकते. अथवा आपण स्वत:ही या खोलीची रचना करू
शकतो.
प्लेरुम तयार करण्यासाठी गरज असते ती मोठ्या आकाराच्या
खोलीची, आपल्या घरांत अशाप्रकारे सदस्यांच्या मानाने अधिक खोल्यांची
व्यवस्था असेल किंवा एखादी अडगळीची खोली नाही तर पाहुण्यांच्या
स्वागताकरीता असलेली खोली वापराविना पडलेली असेल तर तिचा वापर आपल्याला
प्लेरुमसाठी करता येऊ शकतो. मोठ्या आकाराच्या खोलीतील सर्व प्रकारचे सामान
काढून टाकून खोली मोकळी करून त्याचा वापर करता येऊ शकतो.
अनेक
घरांमध्ये मुलांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करून देण्यात
येते. या स्वतंत्र खोलीत त्यांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध होत असली तरी ती
खोली थोडी अडचणीचीच वाटणारी असते. मुलांच्या खोलीव्यतीरीक्त घरामध्ये केवळ
मुलांना खेळण्यासाठीच एखाद्या स्वतंत्र खोलीची म्हणजेच प्लेरुमची व्यवस्था
करता येऊ शकते. लहान मुलांच्या खेळण्याच्या गरजा लक्षात घेता अशा प्रकारची
सुविधा करून घेणे ज्यांना शक्य आहे असे अनेकजण आपल्या घरात एखादी प्लेरुम
तयार करून घेऊ शकतात. जिथे लहान मुलांच्या सोबतीने त्यांनाही काही काळ
मनसोक्तपणे खेळता येईल. या खोलीच्या बनावटीमुळे घरात केवळ टीव्ही पाहत
किंवा व्हीडीओगेम खेळत बसण्याऐवजी लहान मुलांना बैठ्या खेळांसोबतच क्रिकेट,
फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबलटेनिससारखे खेळही खेळता येणे शक्य आहे.
प्लेरुमची सजावट करताना आपल्याला कल्पकतेचा वापर करण्याची पुरेपुर संधी
उपलब्ध होते. या खोलीची सजावट करणे हा देखील आपल्यासाठी एक मजेदार अनुभव
असू शकतो. खोलीची सजावट करताना ही खोली अधिकाधिक उजळ व उत्साही ठेवण्यावर
भर देणे गरजेचे असते. त्याकरीता सर्वात प्रथम रंगाची निवड करताना उजळ
रंगाची निवड करणे सोयिस्कर ठरते. उजळ रंगांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या
रंगछटा सहजतेने उपलब्ध होतात. उजळ रंगांचा पोत भिंतींवर चढवण्याबरोबरच
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नक्षी किंवा सुंदरशी चित्रेही याठिकाणी काढून
घेता येतात. खोलीचे वातावरण बदलून टाकण्यात अशा प्रकारचे रंगकाम
महत्त्वाची भूमिका बजावू शकते. रंगकामानंतर क्रमांक येतो तो फ्लोअरींगचा या
खोलीतील फ्लोअरींगसाठी गुळगुळीत टाईल्स वापरण्याऐवजी हार्डवुडचा वापर
करणेच योग्य ठरते. हार्डवुडचे फ्लोअरींग टाइल्सच्या तुलनेत तलम असते.
टाइल्स गुळगुळीत असल्या तरी कुठल्या एका ठिकाणी त्या तुटल्या किंवा त्यांना
तडा गेल्यास त्यापासून इजा होण्याची शक्यता असते. हार्डवुडच्या बाबतीत तशी
भीती बाळगण्याची गरज नसते. शिवाय हार्डवुड दिसायलाही आकर्षकच दिसते
त्यामुळे या खोलीचे सौंदर्य आपोआपच वाढते. हार्डवुडवर आपण तात्पुरत्या
स्वरुपात बास्केटबॉल, क्रिकेटसारख्या खेळांसाठी आवश्यक असणाऱ्या सीमारेषा,
मध्यरेषा आखू शकतो.
या खोलीत सूर्यप्रकाश व वारा येण्यासाठी
मोठ्या आकाराच्या खिडक्या ठेवण्यास हरकत नाही. पण खिडक्या काचेच्या बनवताना
त्याचसोबत जाळीचीही व्यवस्था करून घेणे आवश्यक ठरते. अनेक खोल्यांमध्ये
आल्हाददायक वातावरणावर भर देतो. परंतु या खोलीमध्ये चांगल्या प्रकारे उजेड
देणारे दिवे लावणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे मैदानावर उजेडासाठी हॉलिजनच्या
दिव्यांचा वापर केला
जातो. याठिकाणी हॉलिजन नसले तरी त्यातुलनेत
खोलीत चांगला प्रकाश निर्माण करणारे दिवे वापरता येतात. दिव्यांची योजना
सीलिंगच्या आतल्या बाजूने केल्यास उत्तम.
फ्लोअरींगवर खोलीच्या
रंगाला साजेसे ठरेल असे तलम मॅट किंवा कापेर्ट अंथरल्यास फ्लोअरींगची शोभा
वाढेल तसे लहान मुले खेळताना पडल्यास वस्तू लावणे जाणीवपूर्वक टाळल्यामुळे
वॉलहॅंगिग, फोटोफेम यांची सजावटीसाठी आवश्यकता लागणार नाही. भींतीवर एखादे
डिजीटल वॉल क्लॉक आपल्याला त्याऐवजी वापरता येईल. या खोलीत खेळांसाठी एका
ठिकाणी स्टंपसाठी जागा करता येईल. भिंतीवर बास्केटबॉलचे बास्केट लावता
येईल. नेमबाजीकरण्याकरीता निशाण लावता येईल. प्रत्येकाच्या खेळातील
आवडीनुसार खोलीमध्ये खेळांच्या साधनांची सजावट आपल्याला येथे करता येईल. या
साधनांची खोलीत केलेली रचनाच खोलीच्या सजावटीत महत्त्वाची भूमिका बजावेल.
या खोलीत फनिर्चर ठेवणे टाळले असले तरी बैठ्या खेळांसाठी आवश्यक असणारे व
आजकाल बाजारात सहज उपलब्ध होणारे फोल्डींग फनिर्चर जसे फोल्डींग चेअर,
फोल्डींग टेबल वगैरे वापरता येईल. खोलीत संगीत ऐकण्यासाठी स्पीकर्स
लावण्याचीही व्यवस्था करता येईल.
No comments:
Post a Comment