विश्वास उत्तम गृहखरेदीचा...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाची सुरूवात करणारा गुढी पाडवा सण
गृहखरेदीदारांबरोबरच विकासकांसाठीही अत्यंत महत्वाचा ठरतो. प्रॉपर्टी
मार्केटसाठी या वर्षाची सुरूवात थोडी आव्हानात्मक ठरणार असली, तरी गुढी
पाडव्याच्या निमित्ताने ग्राहक सकारात्मक दृष्टीने गृहखरेदी करतील असा
विश्वास सर्वच विकासकांना वाटत आहे.
डी.एस. कुलकर्णी, सीईओ, सॉफ्ट कॉर्नर हिंदू वर्षाचा हा पहिला दिवस. साऱ्या हिंदू बांधवांच्या कुटुंबात आणि मराठी माणसांच्या घरांत आनंद घेऊन येणारा असा हा महत्त्वपूर्ण सण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाची सुरूवात असा दुग्धशर्करा योग असल्याने या सणाला अत्यंत महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे लहानातली लहान वस्तू खरेदी करायची असो किंवा प्रॉपटीर्सारखी महत्वपूर्ण खरेदी करायची असो त्यासाठी हा सण महत्वाचा ठरतो. या मुहूर्तावर अनेकजण वीकेण्ड होम प्रॉपटीर् खरेदी करणे तसेच त्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. सध्या आमच्या शहापूर, मुरबाड, कर्जत, नेरळ अशा सगळ्यांच साईट्सवर ग्राहकांच्या व्हिजीट वाढल्या आहेत. व्हिजीट देऊन साईट निश्चित करणे आणि गुढी पाडव्याच्या दिवशी प्रॉपटीर्ची नोंदणी करण्याला अनेकजण पसंती देतात. बजेट हाऊसिंगचा ट्रेण्ड वाढत असल्याचे लक्षात घेऊन आम्ही गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दोन बजेट होमचे प्रोजेक्ट आणत आहोत. गौरव तयाल, डायरेक्टर, केएसएल इंडस्ट्रीज ग्राहकांच्या दृष्टीकोनातून गृहखरेदी करणे ही बाब केवळ आथिर्क समीकरणांवर अवलंबून नसते. तर ग्राहकांची भावनाही त्यासोबत जोडलेली असते. यामुळेच गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा वगैरेसारख्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात गृहखरेदी होत असल्याचे पाहायला मिळते. यंदा देखील गुढी पाडव्याच्या निमित्ताने रियल इस्टेट माकेर्टला गृहखरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मागच्या काळात बऱ्यापैकी पाईज करेक्शन झाले होते. तसेच केंदीय बजेट सादर झाल्यानंतर येत्या काळात घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व लक्षात घेऊन ग्राहक अधिकाधिक गृहखरेदी करतील अशी आशा आहे. गुढी पाडव्यासाठी आम्ही ग्राहकांना खास ऑफर्स देत असून डोंबिवलीच्या आमच्या 'सॉलिटीयर पार्क' या प्रोजेक्टमध्ये घर खरेदी केल्यास नॅनो गाडी जिंकण्याची संधी मिळू शकते. राजेंद्र सावंत, चेअरमन, निर्माण गुप ऑफ कंपनीज सरकारने लादलेल्या करांमुळे घरांच्या किंमतीत वाढ होणे हे आता ठरलेलेच आहे. त्यामुळे ही नित्याचीच बाब समजून गृहखरेदीदार घर खरेदी करू लागले आहेत. गुंतवणूकदारांच्या तुलनेत माकेर्टमध्ये घरांची गरज असलेले ज्येन्युईन बायर्स मोठ्या संख्येने आहेत. असे ग्राहक गुढी पाडवा वगैरे सणांच्या शुभ मुहूर्तावर घर खरेदी करणे पसंत करतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गृहकर्जाचे व्याजदर हळूहळू का होईना उतरत असल्याने त्याचा ग्राहकांना फायदा होतोय. साधारण वीस ते तीस वर्षांच्या काळात ग्राहकांना होमलोन फेडायचे असते. त्यांच्या दृष्टीने ५-६ लाखांच्या फायदा झाल्यास मोठी गोष्ट असते. असा सर्व विचार करता यंदाच्या गुढी पाडव्यालाही चांगल्या प्रमाणात व्यवहार होतील असा अंदाज आहे. अजित मराठे, मॅनेजींग डायरेक्टर, निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज खरं तर मला ग्राहक द्विधा मनस्थितीत असल्याचे वाटतेय. ते अशासाठी की एकीकडे गृहकर्जाचे व्याजदर काही अशांनी का होईना कमी होत चालले असले, तरी दुसऱ्या बाजूला घरांच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत. शिवाय अॅफोडेर्बल घरेही माकेर्टमध्ये म्हणावी त्याप्रमाणात उपलब्ध नसल्याने घर नेमके कधी घ्यावे याचा विचार करत ग्राहक 'वेट अॅण्ड वॉच'च्या स्थितीतून बाहेर पडण्याची संधी शोधत आहेत. मागणी प्रचंड असली, तरी अॅफोडेर्बल माकेर्टमध्ये घरांचा प्रचंड तुटवडा आहे आणि त्याचा घरांच्या किंमतीवरही परिणाम होतोय. अशा परिस्थितीत यंदाच्या गुढी पाडव्याला ग्राहकांचा प्रतिसाद ना कमी ना जास्त म्हणजेच समतोल असा राहील. अमोल पाटस्कर, मॅनेजींग डायरेक्टर, आर.जी. पाटस्कर डेव्हलपर्स सविर्स टॅक्स वाढो किंवा अन्य कुठलाही टॅक्स वाढो तो भरायचाच असल्याने आणि घर घेणेही निश्चित असल्याने ग्राहक थेटपणे प्रॉपटीर् माकेर्टमध्ये उतरत आहेत. त्याचा प्रॉपटीर् माकेर्टवर सकारात्मक परिणाम होतोय. ग्राहक केवळ अॅफोडेर्बल घरांपेक्षा क्वालिटी घर खरेदी करणे अधिक पसंत करीत असल्याने सर्व प्रकारच्या घरांना माकेर्टमध्ये मागणी आहे. गृहकर्जाचे व्याजदर कमी होत असल्याचाही मागील काही दिवसांपासून प्रॉपटीर् माकेर्टला फायदा होतोय. त्यादृष्टीने यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त ग्राहक आणि विकासकांसाठी उत्तम ठरेल असेच वाटते. शंकरराव बोरकर, डायरेक्टर, धनश्री डेव्हलपर्स यंदाचा गुढी पाडवा ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाचा ठरू शकेल. केंदीय बजेटच्या सादरीकरणानंतर घरांच्या किंमती १ एप्रिलनंतर वाढणार आहेत. म्हणजे त्यापूवीर् घराची नोंदणी केल्यास ग्राहकांना फायदा मिळू शकतो. ग्राहकांना याची कल्पना असल्याने यंदा गुढी पाडव्याच्या निमित्ताने गृहखरेदीला चांगला रिस्पॉन्स मिळेल. प्रॉपटीर् माकेर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार घरे उपलब्ध असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी बरेच पर्याय मिळू शकतील. जीतु मोहनदास, मॅनेजींग डायरेक्टर, मोहन ग्रुप प्रॉपटीर् माकेर्टची स्थिती कशीही असो पहिले घर घेण्याच्या तयारीत असलेला ज्येन्युईन बायर प्रॉपटीर् माकेर्टमध्ये उतरतोच. सध्याही माकेर्टमध्ये ज्येन्युईन बायर्सची संख्या खूप असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी यानिमित्ताने चौकशी व नोंदणी प्रक्रिया पार पाडली जात आहे. आमच्या बदलापूर, अंबरनाथ येथील मोहन सबबिर्या या टाऊनशीप प्रकल्पाचा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. समीर नातू, डायरेक्टर, नातू परांजपे समूह सविर्स टॅक्स तसेच एक्साईट ड्युटीमध्ये झालेल्या वाढीमुळे सीमेंट, स्टील, वाळू इ. सारख्या कच्च्या मालांच्या किंमतीमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहाजिकच घरांच्या किंमतीचा ग्राफही उंचावणार आहे. याकडे पाहता ज्येन्युईन बायर्सनी शक्य तितक्या लवकर गृहखरेदीस उतरले पाहिजे. त्यादृष्टीने गुढी पाडव्याचा मुहूर्त अगदी उत्तम आहे. नवीन कर लागू होण्याच्या आत म्हणजेच १ एप्रिलच्या अगोदर गृहखरेदी केल्यास ग्राहकांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रवीण पटेल, चेअरमन, राज गुप बाजारात पहिल्या घराची खरेदी करणारा मोठा ग्राहकवर्ग अशा मुहूर्तावर घर खरेदी करण्यास उतरत असल्याने यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उत्स्फूर्तपणे गृहखरेदी होत असल्याचे पाहायला मिळेल. साधारण २५-३० लाखांच्या दरम्यानची, स्टेशनपासून जवळ अशी घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याने या किंमतीतील घरांना चांगला प्रतिसाद मिळेल. बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा सारख्या डेस्टिनेशनवर अशी भरपूर घरे उपलब्ध असल्याने या डेस्टिनेशन्सकडे ग्राहक अधिक संख्येने धाव घेतील. सुरेश हावरे, मॅनेजींग डायरेक्टर, हावरे बिल्डर्स साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या सणामुळे रियल इस्टेट माकेर्टमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळतेय. केंद सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये रियल इस्टेट इंडस्ट्रीसाठी आणि सामान्य गृहखरेदीदारांसाठी फार काही नसले, तरी मागच्या काही दिवसांपासून कमी होत असलेल्या गृहकर्जांच्या व्याजदरामुळे ग्राहकांमध्ये समाधानाची भावना आहे. येत्या काळातही व्याजदरात कपात होण्याची चिन्हे असल्याने 'वेट अॅण्ड वॉच'च्या स्थितीत गेलेला ग्राहकही आता माकेर्टमध्ये घर खरेदीसाठी उतरू लागला आहे. आमच्या ठाण्यातील हावरे सिटी आणि हावरे इस्टेट या दोन्ही प्रोजेक्ट्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. |
No comments:
Post a Comment