Monday 3 December 2012

चिल्ड्रन्स बेडरूम



चिल्ड्रन्स बेडरूम

आपल्या घराच्या इंटिरिअरचा आपल्या व्यक्तिमत्वावर सारखाच परिणाम होत असतो. विशेषत: लहान मुलांवर. हा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा असू शकतो. कारण लहान मुलांचे मन खूप संवेदनशील असते. लहान मुले टिप कागदासारखी असतात. आजूबाजूच्या वातावरणातल्या गोष्टी मुले निरीक्षण करून सारखी टिपत असतात. त्यामुळेच ज्या रूममध्ये ती सर्वाधिक वेळ काढतात, त्या रूमच्या इंटिरिअरचा त्यांच्यावर परिणाम न झाला तरच नवल. म्हणूनच चिल्ड्रन बेडरूमही अतिशय काळजीपूर्वक डिझाइन करावी लागते. डिझाइन करताना या रूमचे वातावरण हसरे, खेळकर राहील याची खबरदारी घ्यावी लागते.

मुलांचे स्वत:चे असे विश्व असते, गरजा असतात. त्या अनुषंगाने डिझाइन करणे नेहमीच उपयुक्त ठरते. आधीच्या काळात आकाराने लहान असलेली रूम मुलांसाठी राखून ठेवली जायची, थोडाफार कलर, डेकोर केला जायचा. पण स्पेशल चिल्ड्रन बेडरूमची संकल्पना गेल्या काही वषांर्तच आपल्याकडे रूजू लागली आहे. परदेशात प्रत्येक रूमचा असा स्पेशल इंटिरिअर डिझायनर असतो. आजकाल थोड्या प्रमाणात का होईना आपल्याकडेही स्पेशालिस्ट इंटिरिअर डिझायनर दिसायला लागले आहेत. त्यांची सेवा अन्य डिझायनरपेक्षा थोडी महाग असते. आपल्या लहान मुलांची रूम डिझाइन करताना डिझायनरशी विस्तृत चर्चा करावी आणि या चचेर्त मुलांचा सहभाग महत्त्वाचा असावा. या चचेर्तून डिझायनरला बरीचशी उत्तरे सापडतात जसे की त्यांच्या आवडीनिवडी, आवडते रंग, आवडते कार्टून्स, गरजा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मुलांना खूश करणे ही एक मोठी टास्क असते.

चिल्ड्रन्स बेडरूम डिझाइन करताना काही मूलभूत महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात. ती रूम कितीजण शेअर करणार आहेत, त्यावर रूमचा फनिर्चर लेआऊट ठरतो. वापर करणारा मुलगा आहे की मुलगी आहे यावर रूमचा लूक अवलंबून असतो. वयानुसार मुलांची आवडनिवड बदलत जाते. त्यामुळे मुलांचा वयोगटही ध्यानात घ्यावा. मुलांच्या आणि मुलींच्या आवडीनिवडीत खूप फरक असतो. त्यांची रंगांची आवडही वेगळी असते. सामान्यत: मुलांना लाल, निळा, पिवळा या रंगांच्या डार्क व ब्राईट शेड्स आवडतात. तर मुलींना गुलाबी, जांभळा, पोपटी अशा रंगांच्या फिक्कट पेस्टल शेड्स आवडतात. मुले थोडी शार्प डिझाइनकडे आकषिर्त होतात तर मुली गोलाकार डिझाइन्स अधिक पसंत करतात. मुलींना आजूबाजूला बाहुल्यांचे विश्व साकारण्यास अधिक आवडते. तर मुलांना गाड्यांमध्ये रमणे आवडते. चिल्ड्रन्स रूममध्ये डिझाइन कुठलीही असो पण तीक्ष्ण कोपरे फनिर्चरच्या कडा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही.

चिल्ड्रन्स बेडरूममध्ये साधारणपणे बेडसाईड, टेबल वॉर्डरोब, स्टडी टेबल, स्टोरेज अशा प्रकारचे फनिर्चर असते. वयोगटानुसार या फनिर्चरच्या स्टाईल, शेप व साईझमध्ये फरक पडत जातो. मुलांचे प्रामुख्याने एक ते पाच, पाच ते दहा, दहा ते पंधरा व पंधरा आणि त्यापुढे असे वयोगट पडतात. या वयोगटानुसारच डेकोरमध्ये फरक पडत जातात.

पाच वर्षांपर्यंत - या वयोगटातील मुलांसाठी वेगळी रूम डिझाइन करायची असेल तर ती रूम छान पेस्टल शेडमध्ये रंगवून घ्यावी. या वॉल पंेण्टिंगमध्ये वेगवेगळे पॅर्टन्स उपलब्ध आहेत. भिंतीवर खास लहानग्यांसठी चंद, सूर्य, तारे, ढग, फुले, फुलपाखरे अशी लहान मुलांना आवडणारी चित्रे लावावीत. त्याचबरोबर त्यांना वावरायला भरपूर मोकळी जागा ठेवावी. फनिर्चरचा वापर जेवढ्यास तेवढा ठेवावा, खेळण्यासाठी मोठे पण त्यांना वापरता येईल असे स्टोरेज ठेवावे, दरवाजे आतून लॉक होतील असे असू नयेत. आजकाल बरेचजण त्यांच्या मुलांना सांभाळणाऱ्या र्सव्हंटवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावतात. त्याचे प्रक्षेपण आपण इंटरनेटवर किंवा मोबाईलवरदेखील पाहू शकतो. याचा खर्च साधारणपणे पंधरा ते वीस हजारांपर्यंत येतो. फ्लोअरिंगसाठी मऊ कापेर्ट वापरल्यास उत्तम.

पाच ते दहा वषेर् - या वयोगटातील मुलांना खेळणी, गाड्या, कार्टून्स यांत खूप रस असतो. मुले रंगांकडे खूप आकषिर्त होतात. म्हणूनच या रूममध्ये भरपूर रंगांचा वापर करावा. त्याचबरोबर एकूण डेकोर गॉडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यांच्या खेळण्यांसाठी व कपड्यांसाठी मोठे स्टोरेज असावे, खेळण्यासाठी एक मोठा प्ले एरिया असावा. जास्त उंचीचे फनिर्चर नसावे ज्यावरून पडून इजा होऊ शकते. प्रत्येक मुलाची काही आवडती कार्टून कॅरेक्टर्स असतात. त्या कार्र्टून्सची स्टीकर्स, पोस्टर्स, कटआऊट्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात. ही सामग्री खास मुलांसाठी असलेल्या मी अॅण्ड मॉम्स, ग्रीन बेल, मदर केअर अशा दुकानात उपलब्ध असते. तसेच आजकाल नॉव्हेल्टी शॉप्स आणि स्टेशनरी शॉप्समध्येही हे आपल्याला मिळू शकते.

No comments:

Post a Comment