Monday 3 December 2012

वास्तुपूजन


वास्तुपूजन



वास्तुची प्रार्थना झाल्यानंतर दुस-या संकल्पानुसार वास्तुमध्ये गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, भूमी पूजन इत्यादी विविध प्रकारांनी पूजन केले जाते. जेणेकरून वास्तुत राहायला येणा-या कुटुंबांला या जागेत स्थैर्य लाभून त्या कुटुंबाची अनेक अर्थांनी भरभराट होऊ शकेल.

स्तुची प्रार्थना झाल्यावर दुसरा संकल्प हा की, या कार्याचे अंगभूत असे गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्यवर्धक मंत्र श्रवण, नांदीश्राद्ध, ब्राह्माणवरण, दिग्रक्षण, पंचगव्यकरण, भूमी पूजन, स्थंडिल निर्माण, भूसंस्कार, अग्निस्थापन, वास्तुचक्र, वास्तू, ध्रुव, शेष यांच्या प्रतिमा पूजन गृहस्थापन, रुदपूजेनंतर होमहवन, उत्तरपूजन, बलिप्रदान, पूर्णाहूती, वास्तुनिक्षेप, गृहप्रवेश इत्यादी सर्व कायेर् मी करीन असा केला जातो. गणपती स्मरण, शंख, घंटा पूजन, कलश पूजन, सूर्य पूजन, दीप पूजन केल्यावर विघ्नर्हत्या गणपतीचे पूजन करून पुण्याहवाचन केले जाते.

पुण्याहवाचन

यात संकल्पित कार्यासाठी देव ब्राह्माणांचे आशीर्वाद घेणे हे प्रमुख अंग आहे. ते असे, हे देवांनो, हे ब्राह्माणांनो, मी सहकुटुंब सहपरिवार आपल्याला नमस्कार करतो व आशीर्वादाची अपेक्षा करतो. मी आता जी वास्तुशांती व अन्य पूजा करणार आहे, त्याला अनुसरून मंगलसूचक आशीर्वचने द्यावीत. पुण्याहं भवंतु ब्रवंतु - म्हणजे आम्हाला या कर्मापासून पुण्यलाभ होवो. आम्ही पुण्यवान होवोत असा आम्हाला आशीर्वाद द्या. कल्याण भवंतु ब्रुवंतु - म्हणजे आमचे या कर्मापासून कल्याण होवो. आपले कल्याण होवो असा आम्हाला आशीर्वाद द्या. वृद्धी भवंतु ब्रुवतंतु - म्हणजे आमची या कर्मामुळे सतत वृद्धी व्हावी. कधीही कोणतेही गोष्टी कमी पडू नये आपली वृद्धी होवो असा आम्हाला आशीर्वाद द्या. स्वस्ति: भवतुं ब्रवंतु - आम्हाला या कर्मामुळे स्वस्ति म्हणजे शुभता स्वस्थता लाभो व अशुभ दूर जावो. आम्हाला स्वस्ति लाभ होवो असा आम्हाला आशीर्वाद द्या. श्री: भवंतु ब्रुवंतु - या कर्मामुळे श्री अर्थात लक्ष्मी म्हणजे धन्यधान्यादि लाभो मिळो. लक्ष्मीची कृपा प्राप्ती होवो. आपण श्रीमान व्हा असा आशीर्वाद आम्हाला द्या. या नंतर कलशातून घेतलेल्या पवित्र जलाने स्नान करतात. (त्यातील पाणी यजमानाने अंगावर ब्राह्माण शिंपडतात).

औक्षण

सुवासिनीने यजमानांना औक्षण करावे. यात मांगल्याचे प्रतिक अशा या दिव्याप्रमाणे सर्वांना प्रकाश द्या, सुवर्णाप्रमाणे शुद्ध व तेजस्वी व्हा, कापसासारखे मुलायम व वयोवृद्ध व्हावा, दूर्वांसारखा वंशविस्तार होवो. कपाळी मंगलतिलक व सौभाग्य लेणे कायम राहो असा हा मातृस्वरूप सुवासिनीचा आशीर्वाद दिला जातो.

मातृकापूजन

कुलदेवता यांसह सोळा मातृका सात घृत मातृका यांचे पूजन व प्रार्थना केली जातो. आदिशक्ती महामायेची अनेक रुपे आहेत. त्यात १५ प्रमुख रुपे व आम्हाला कुलदेवता मिळून १६ मातृका व एक गणेश, तसेच याच बरोबर मंगल कार्याचे निमित्ताने ७ धृतमातृका यांची स्थापना व पूजा करून वायनदान करतात. यामध्ये साडी, चांदीचे हळदकुंकवाचे करंडे, मंगळसूत्र, फणी, आरसा, काजळडबी व अन्य शंृगार साहित्य यांचा समावेश असतो.

आयुष्यमंत्रजप

यजमानास आरोग्यासह दीर्घायुष्य लाभावे यासाठी ब्राह्माणांनी दिलेला आशीर्वाद.

नांदीश्राद्ध

नांदी म्हणजे शुभनाद व सुभदानाने होणारे श्राद्ध म्हणजे नांदीश्राद्ध. मंगलमयी देवांच्या बरोबरीने पूर्वजांचे स्मरण व त्यांना आवडणाऱ्या पदार्थांचे दान करण्याची आपली परंपरा आहे, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे. त्यात सत्य - वसु हे विश्वदेव, आई, आजी, पाणजी, वडील, आजोबा, पणजोबा ही पितृमातृत्रयी आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आजी, आजी, पणजी या बारा पितरांचे स्मरण करून दर्भावर पूजन व २८ ब्राह्माणांचे जेवण दक्षिणा यांचा संकल्प केला जातो. देवतांच्या पूजेबरोबर पितरांचे पूजन केल्यावर पितरांची अक्षय्य तृप्ती होते.

ब्रह्माणवरण

याचा अर्थ ज्याप्रमाणे कार्य करताना पदाधिकारी नेमतात तसे हे पदाधिकारी व त्यांची कायेर्. १) आचार्य - यज्ञाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे व्यक्ती म्हणजे आपले गुरुजी. २) ब्रह्माा - यज्ञप्रक्रिया पूर्ण करून घेणे, अग्निकार्य व अग्निरक्षण करणे. ३) गाणपत्य - यज्ञ निविघ्नपणे पार पाडावा यासाठी याची जबाबदारी गाणपत्याची. ४) सादस्य - यज्ञासाठी साधन सामुग्री पूर्णपणे तयार ठेेवणे व त्याचा योग्य विनियोग करणे.

५) ऋत्विज : मंत्र व तंत्र यांचा मेळ घालणे. आपल्यावर आलेली जबाबदारी 'वृतोस्मि म्हणून ब्राह्माण' स्वीकारतात. यजमान ब्राह्माणांनी प्रार्थना करतात की, या भागातून उत्पन्न झालेली शुभ फलनिष्पत्ती योग्य प्रकारे जाणून ते श्रेय आम्हाला द्यावं म्हणून योग्य व सुप्रसन्न अंत:करण ठेवून हे कार्य विधिपूर्वक पार पाडा.

दिग्रक्षण

दिग्रक्षण म्हणजे या वास्तुच्या आत बाहेर अनेक दुष्ट शक्ती अदृश्य स्वरूपात असतात. त्यापासून अशुभ फळे मिळतात. त्यांना तुम्ही येथून निघून जा किंवा ते नश्यंतु शिवाज्ञया. शंकराच्या आज्ञेने तम्चा होवा असे सांगून ठिकाणाकडून येणारी दुष्ट कंपने थांबविली जातात.

पंचगण्य

वेदकालापासून ते आजच्या अणुयुगापर्यंत याचे महत्त्व अनेक माध्यमात वर्णन केले आहे. गाईचे दूध, तूप, दही, गोमूत्र, गोमय व दर्भाचे पाणी यांचे एकत्रित मिश्रण करून ते अभिमंजित केले जाते. त्याचे प्रोक्षण व प्राशन हे अत्यंत हितावह आहे. ज्याप्रमाणे अग्नी, इंधन नष्ट करणे त्याप्रमाणे दहात व्याधीरुपाने साचून राहिलेले पाप पंचगव्याने नष्ट होते. गोमूत्राच्या नित्य सेवनाने काही त्वचारोग समूळ नाहीसे होतात. तसेच काही अस्थिविकारांवर आणि काही यकृतासंबंधी व्याधीवर गोमूत्र आणि गायीचे दूध उपयुक्त ठरते असे आयुवेर्दात सांगितले आहे.

जुन्या काळी क्षयरोगावर परिणामकारक औषध शोधले गेले नव्हते. विविध उपचार करूनदेखील एका रुग्णाची स्थिती दिवसंेदिवस बिघडत चालली होती. एके दिवशी या रुग्णाने डॉक्टरांना विनंती केली की, आपल्या देशात दक्षिणेला पीडिनीय पहाडांच्या पायथ्याशी लुई नावाचं छोटसं गाव आहे. तेथे कोणत्याही व्याधींचे कोणतेही रुग्ण कोणतेही औषध न घेता केवळ प्रार्थनेने बरे होतात असे म्हणतात. रुग्णाने अतिशय तळमळीने त्यांना विनंती केली, माझं काही कमी-जास्त झालं तर त्याची जबाबदारी माझ्यावरचं. एवढंच नव्हे, तर डॉक्टरांनादेखील आपल्या सोबत येण्याचा आग्रह त्याने केला. या गोष्टीला डॉक्टर कॅरेल बिलकूल तयार नव्हते. परंतु अनिच्छेनेच संमती दिली व ते दोघे लुई या गावी पोहोचले. तेथील अवस्था बघून डॉक्टर अधिकच वैतागले. तेथे कोणतेही औषधं नव्हते व रुग्णाची ही अंतिम स्थिती असल्याने उपचार करताना रुग्णाची योग्य ती काळजी घ्यावी असे त्या संस्थेच्या व्यवस्थापकाला सांगितले. तेथील नियमाप्रमाणे सर्व लोक शिस्तीने गांभीर्याने व शांततेने एकत्र जमले. रुग्णासाठी अत्यंत भक्तिभावाने अनन्य प्रार्थना केली व त्याच्या स्वास्थाबद्दल देवाजवळ करुणा भाकली व जवळच असलेल्या झऱ्यात स्नान करण्यास सांगितले. या झऱ्याचे पाणी इतके थंडगार होते की, रुग्ण जर पाण्यात उतरला तर त्याचं शवच हाती लागेल म्हणून डॉ. कॅरेल यांनी पाण्यात उतरण्यास रुग्णास सक्त मनाई केली. परंतु रुग्ण जीवनाला कंटाळला होता व शेवटचा उपाय म्हणून तो पाण्यात उतरला व डुंबलादेखील आणि बाहेर आल्यावर त्याच्या अंगात विलक्षण स्फूतीर् दिसली. हे दृश्य पाहून डॉक्टर अचंबित झाले. नियमित प्रार्थना व नियमित स्नान याने तो रुग्ण बरा झाला होता. त्याची त्यांनी तपासणी केली. फुफ्फुसातील क्षयरोगाचं नामोनिशाण शिल्लक नव्हतं. पण डॉक्टरांचे बुद्धिजीवी व वैज्ञानिक मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. त्यांचा असा तर्क होता की, हा परिणाम प्रार्थनेचा नसून झऱ्याच्या पाण्याचा असावा. पाण्यात विलक्षण व अद्भूत गुण असावेत. या शंका निरसनासाठी पाण्याच्या बऱ्याच तपासण्या केल्या पण त्यामध्ये कोणतेही विशेष गुणधर्म आढळले नाही. उलट त्यामध्ये रोगजंतूचे प्रमाण आढळले. अखेर डॉक्टरांना हार पत्करावी लागली. रुग्ण प्रार्थनेने बरा झाला हे त्यांनी मान्य केले व त्यांनी उद्गार काढले की, 'प्रार्थनेची शक्ती जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.

No comments:

Post a Comment